भंडारा- मंगळवारी कोथुर्णा गावात झालेल्या टॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला न्याय मिळावा, या मागणीसाठी समस्त गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. शासनाच्या निष्काळजीमुळे या तरुणाचा जीव गेला, त्यामुळे गावातील अवैध वाळूघाट चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी तसेच मृताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आणि शासकीय नौकरी द्यावी, अशी मागणी या गावकऱ्यांनी यावेळी केली आहे.
...म्हणून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोथुर्णा गावकऱ्यांचे आंदोलन
मंगळवारी सायंकाळी कोथुर्णा गावात राहणारा शरद उके या 35 वर्षीय तरुणाचा अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा मृतदेह उचलू दिला नाही. लोकांच्या आंदोलनामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते.
मंगळवारी सायंकाळी कोथुर्णा गावात राहणारा शरद उके या 35 वर्षीय तरुणाचा अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा मृतदेह उचलू दिला नाही. लोकांच्या आंदोलनामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. बुधवारी कोथुर्णा, इंदूरखा या गावातील आणि भंडारा शहरातील बरेच लोक एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. शासनाला वारंवार सांगूनही अवैध वाळूच्या हा व्यवसाय आणि त्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना शासकीय अधिकारी कारवाई करत नाही, त्यांना मदत करतात आणि त्यामुळेच शरद उकेचा अपघात झाला. त्याच्यामागे म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या घरावर उपासमारीची वेळ आली आहे. ही वेळ या कुटुंबावर ज्यांच्यामुळे आली ते पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, पोलीस विभागातील लोक आणि वाळू तस्करी करणारे लोक यांच्यावर कारवाईची मागणी यावेळेस केली. या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत म्हणून 25 लाख रुपये द्यावे. तसेच मृताच्या पत्नीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात नरेंद्र भोंडेकर यांनी मध्यस्थी करून प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनधिकृत ट्रॅक्टरवर आणि वाळू माफियांवर तसेच त्यांना मदत करणारे प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.