महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयएएस अधिकारी भासवून अनेक बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

विजय रणसिंग याचा खात्यात जमा होत असल्याचे पाहता बँक अधिकाऱ्याना त्याच्यावर संशय आला व त्यांनी थेट जिल्हा महिला व बालविकास कार्यालय गाठत या बद्दल माहिती विचारली. अश्या प्रकारची कुठल्याही पदावरील व्यक्ती जिल्ह्यात नसून हा फसवेगिरी असल्याचा प्रकार त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली होती.

आयएएस अधिकारी भासवून अनेक बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

By

Published : Apr 17, 2019, 11:07 AM IST

भंडारा -गोंदिया जिल्हातिल अनेक सुशिक्षित बेरोजगारांना फसवणाऱ्या बोगस आयएएस अधिकारी विजय रणसिंग याला अखेर अटक करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्याला कणकवली येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आयएएस अधिकारी भासवून अनेक बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

महिला व बाल विकास विभागात विभागीय उपसचिव असल्याचे भासवत नोकरी देण्याच्या नावावर एका बोगस आयएएस अधिकाऱ्यांने भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना फसवले असल्याची धक्कदायक बाब समोर आली होती. यामध्ये गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील अनेक युवक युवतीचा समावेश आहे. विजय रणसिंग असे या भामट्या आरोपीचे नाव असून भंडारा पोलिसात त्याच्याविरुद्ध फेब्रुवारी २०१८ ला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याची माहिती मिळताच आरोपी विजय रणसिंग पसार झाला होता. त्याच्या मागावर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम नियुक्त केली होती. मात्र, मागच्या वर्ष भरापासून रणसिंग पोलिसांना सापडला नाही. रणसिंग याने भंडारा येथून पळ काढत कणकवली गाठले आणि तिथे ही आपला फसवुणुकीचा धंदा सुरू केला. शिक्षण विभागातील अधिकारी असल्याचे सांगत लोकांची फसवणूक केली. येथे आरोपी विजय रणसिंग बोगस आयएएस अधिकारी म्हणून मिरवत असल्याची माहिती मिळाली. अखेर मोठ्या शिताफिने त्याला अटक करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे सरकारी नोकरी करता आवश्यक ती सगळी जबाबदारी या भामट्याने अगदी हुबेहूब पार पाडत जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना गंडविले असल्याची बाब उघड झाली आहे.

या आरोपी ने सर्वप्रथम भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क ऑफिस उघडले व वेब साईड तयार करत त्याची जाहिरात वेब साईड तसेच वर्तमानपत्रच्या माध्यमातून देण्यात दिली. एवढचं नाही तर आवश्यक पदासाठी परीक्षा सुद्धा घेण्यात आली. काही उमेदवारांचा ऑनलाईन निकाल लावत हुबेहूब महिला व बालविकास विभागाच्या लोगोसह नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले, आता नियुक्ती होणार या आशेवर अनके उमेदवार होते. त्याच वेळेस या भामट्याने जिल्ह्यात एक बँकेत खाते उघडत या खात्यात अनके उमेदवारांना पदा प्रमाणे पैसे टाकण्यास लावले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये आरोपी

विजय रणसिंग याचा खात्यात जमा होत असल्याचे पाहता बँक अधिकाऱ्याना त्याच्यावर संशय आला व त्यांनी थेट जिल्हा महिला व बालविकास कार्यालय गाठत या बद्दल माहिती विचारली. अश्या प्रकारची कुठल्याही पदावरील व्यक्ती जिल्ह्यात नसून हा फसवेगिरी असल्याचा प्रकार त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली होती. आरोपी विजय रणसिंग याने विभागीय उपसचिव असल्याचे भासवण्याचा आपल्या चार चाकी वाहन वर भली मोठी नेम प्लेट , ओळख पत्र , हे सुद्धा हुबेहूब बनवले होते. त्यामुळे पाहता क्षणी अनके उमेदवार त्याचा या जाळ्यात फसत गेले. त्यांच्याकडून तो पैसे उकळत गेला. एकट्या भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत २५ ते ३० तरुण तरुणींना त्याने गंडविले असून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख प्रमाणे तब्बल 82 लाखाचा गंडा घातला आहे. हा आकडा गोंदिया नागपूर येथील उमेदवारांचा विचार केला असता रक्कम करोडो च्या घरात जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details