भंडारा -जिल्ह्यातील बहिरंगेश्वर मंदिरामध्ये ( Bahirangeshwar Temple ) 5 डिसेंबरला (काल) देव दिवाळी ( Dev Diwali ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर सजविण्यात आले होते. देवाला सकाळी उटणं लावून पूजा करण्यात आली. तर सायंकाळी महापूजा आणि महाआरती ( Mahapuja and Mahaarati ) करण्यात आली. हजारो दिव्यांची आरास आणि 56 भोग देवाला चढविण्यात आले. भाविकही मोठ्या संख्येने देवाची महाआरती ( Maha Aarti of God ) करण्यासाठी देव दिवाळी साजरी करण्यासाठी आजच्या दिवशी मंदिरात जमले होते. पूजेनंतर आतिषबाजी करून महाप्रसादाचे वितरण केले.
बहिरंगेश्वर मंदिरातील दृश्य मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लप्रतिपदेला साजरी होते देव दिवाळी
मागील दहा वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिरामध्ये देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे ही देव दिवाळी अतिशय उत्साहात साजरी केली जाते. जेजुरीच्या गडावर मणीमल्ल्य दैत्याचा नरसंहार करण्यासाठी देव अवतरले होते. देवाने मणी मल्ल्य दैत्याचा संहार केला होता आणि म्हणून हा दिवस आनंदाचा दिवस असतो. त्याचे प्रतिक म्हणून देव दिवाळी साजरी केली जाते.
सकाळपासून सुरू होते देव दिवाळी
देव दिवाळीच्या दिवशी पहाटे देवाला उटनांने स्नान घातले जाते. देवाला फुलांची आरास केली जाते. देवाचा संपूर्ण कक्ष हा फुलाने आणि दिव्यांनी सजविला जातो. सायंकाळी जवळपास दोन तास देवाची महापूजा केली जाते. कोणी नृत्य करून तर कोणी गाणे म्हणून या दिवाळीच्या उत्साहात भर घालतात. बहिरंगेश्वर मंदिराच्या परिसरात असलेले श्री राम मंदिर, श्री स्वामी लक्ष्मीनारायण व श्री गणेश मंदिरात महापूजा केली जाते. मंदिरावर रोषणाई केली जाते. हजारो दिव्यांची आरास केली जाते. तसेच देवाला 56 पदार्थाचा भोग चढविला जातो. दोन तासाच्या महापूजेनंतर महाआरती केली जाते आणि त्यानंतर भाविक देवाचे दर्शन घेतात तसेच मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली जाते. या देव दिवाळीच्या पूजेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण केले जाते. देव दिवाळी साजरी करण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी जमतात आणि देव दिवाळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हेही वाचा -अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत? याचा विचार करायला हवा - चंद्रकांत पाटलांचा सवाल