महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा : बावनथडी धरणाच्या कालव्याचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान

तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून उन्हाळी धान लागवडीसाठी बावनथडी प्रशासनने पाणी सोडले. परंतु, कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले. यामुळे शेतातील पीक सडले आहे. धरणाचे पाणी सोडण्यागोदर कालवा कुठे क्षतिग्रस्त तर झाला नाही ना, याची साधी पाहणी न करता पाणी सोडल्यामुळे दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी शिरले. पाणी शेतात साचून राहिल्याने शेतातील चणा, लाखोरी व गहू ही पिके खराब झाली.

भंडारा बावनथडी धरण न्यूज
भंडारा बावनथडी धरण न्यूज

By

Published : Feb 2, 2021, 4:20 PM IST

Updated : Feb 2, 2021, 6:59 PM IST

भंडारा - जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नवरगाव परिसरातील बावनथडी कलवा क्र.2 अंतर्गत तुमसर बोरी येथील कालव्याच्या पार फुटल्याने बावनथडीचे पाणी चक्क शेतात शिरल्याने शेतातील लाखोरी, गहू, चणा इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची झाली. 8 वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाचे देखभाल-दुरुस्ती न झाल्याने या कालवा फुटला आहे. नुकसानीची चौकशी सुरू केली असून त्याची माहिती वरिष्ठांना दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भंडारा : बावनथडी धरणाच्या कालव्याचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान
शेतात पाणी गेल्याने पीक सडले

तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून उन्हाळी धान लागवडीसाठी बावनथडी प्रशासनने पाणी सोडले. परंतु, कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले. यामुळे शेतातील पीक सडले आहे. धरणाचे पाणी सोडण्यागोदर कालवा कुठे क्षतिग्रस्त तर झाला नाही ना, याची साधी पाहणी न करता पाणी सोडल्यामुळे दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी शिरले. पाणी शेतात साचून राहिल्याने शेतातील चणा, लाखोरी व गहू ही पिके खराब झाली. शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने यासाठी खर्च केलेला पैसाही वाया गेला आणि पीकही सडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासकीय चुकीमुळे हातात येणारे पीक गेल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

हेही वाचा -बीड : ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

हस्तांतरण थांबले आहे

बावनथडी प्रकल्पाचे बांधकाम 8 वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पाचे अजूनही सिंचन विभागाकडे हस्तांतरण झालेले नाही. यामुळे मागील आठ वर्षांपासून या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम झालेच नाही. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी हे कालवे उखडले किंवा फुटलेले आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नुकसानीची चौकशी सुरू

शेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे त्यांची पीक सडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे. मात्र, विभागात कर्मचारांची संख्या कमी असल्यामुळे तसेच अनुदान नसल्यामुळे काम करण्यास अडचण होत असल्याचे सहायक अभियंता यांनी सांगितले.

अस्मानी व सुल्तानी संकटात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी नेहमी सापडत आहे. त्यातच शासनाच्या चुकीमुळे तुमसर तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा -कोळीवाड्याच्या जमिनींसंदर्भात नाना पाटोलेंचे महत्त्वाचे निर्देश

Last Updated : Feb 2, 2021, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details