महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकीच्या पेट्रोल टाकीत, सीटखाली दारू वाहतूक करणाऱ्याला बेड्या

पवनी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये दारूची अवैध वाहतूक आणि तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. पहिल्या कारवाईत सिनेस्टाईल पाठलाग करत दुचाकीमध्ये दारू भरून वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

आरोपीस अटक
आरोपीस अटक

By

Published : May 17, 2021, 4:58 PM IST

भंडारा - पवनी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये दारूची अवैध वाहतूक आणि तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली असून दोनजण फरार झाले आहेत. पहिल्या कारवाईत सिनेस्टाईल पाठलाग करत दुचाकीमध्ये दारू भरून वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तर दुसर्‍या कारवाईत अवैध दारू चारचाकीमध्ये भरत असताना एकाला अटक केली असून दोनजण फरार आहेत.

दुचाकीच्या पेट्रोल टाकी, सीटखाली दारू वाहतूक करणाऱ्याला बेड्या

दुचाकीच्या सीटखाली लपवल्या दारुच्या बाटल्या

भंडाऱ्यात लॉकडाऊन काळात दुचाकीच्या पेट्रोल टाकीत व सीटखाली 500 देशी दारुच्या बाटल्या लपवून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी करणाऱ्या आरोपीला भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केल्याची घटना घडली असून एका आरोपीला अटक केली आहे. शिवराज चिनकम वेरपुरी (वय 38 रा. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दारू आणि गाडी असा 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध दारू वाहतूक करणाऱ्याकडून 3 लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त
पवनी पोलीस स्टेशन हद्दीतील आसगाव येथील देशी भट्टीचा चालक/मालक तुलशी ऊर्फ तुळशिदास वामनराव पडोळे (वय अंदाजे 37 वर्ष रा.आसगाव) यांच्या भट्टीतून नोकराच्या मदतीने वाहन मारुती रिट्स क्रमांक MH-40-A-9741 मध्ये दारूचे बॉक्स भरत असताना पोलिसांनी धाड टाकली असता भट्टी मालक व नोकर घटना स्थळावरून फरार झाले असून वाहन चालक गेंदलाल ऊर्फ संतोष गुनाजी घोशीकर (वय 34 वर्ष, रा. बजरंग वार्ड, पवनी) याला अटक करण्यात आली आहे. वाहन चालकाच्या ताब्यातून वाहनामध्ये भरलेले 7 बॉक्समध्ये 336 पव्वे, 20 बॉक्समध्ये 2000 टिल्लु पव्वे व एक मारोती रीट्स वाहन असा एकुण 3 लाख 10 हजार 160 रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस उपनिरीक्षक भिलावे, पो. हवा. गंगाधर नागरिकर, पो. ना. अनिल कळपते, पो. शी. संतोष लांजेवार, विनोद आरिकर, मपोशी सुप्रिया कान्हेकर यांनी केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत.

हेही वाचा -मुंबईत जनजीवन विस्कळीत; वाहतूक सेवा प्रभावित, एनडीआरएफ टीम दाखल

हेही वाचा -दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईतील 221 झाडांचा वादळाने घेतला बळी, 15 गाड्यांचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details