महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस बॉईज संघटनेचे प्रशंसनीय कार्य, गर्दीच्या ठिकाणी कोरोनाविषयी करतात प्रबोधन

पोलीस बॉईज संघटनेतील सर्व तरूण हे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची मुले आहेत. पोलीस अधीक्षकांनी त्यांना मदतीची हाक देताच हे सर्व तरुण विनामूल्य सेवा देण्यासाठी तयार झाले.

Police Boys Group
पोलीस बॉईज ग्रुप

By

Published : Jun 5, 2020, 7:55 PM IST

Updated : Jun 23, 2020, 8:45 PM IST

भंडारा-पोलीस विभागातील कर्मचाऱ्याच्या तरूण मुले पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण जिल्हाभर कोरोनाविषयी प्रबोधन करत आहेत. यासाठी संघटनेतील 35 तरुण दररोज अतिशय गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी, तोंडावर मास घालण्यासाठी सांगतात. तसेच नागरिकांना भेडसवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पोलीस बॉईज संघटनेचे प्रशंसनीय कार्य, गर्दीच्या ठिकाणी कोरोनाविषयी करतात प्रबोधन

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आवश्यकता असल्यास तिथे गेल्यावर सोशल डिस्टनसिंग ठेवावे, तसेच तोंडावर मास्क घालावे आणि नियमित सॅनिटाइझर करावे, असे सरकारतर्फे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी नागरिक हे नियम पाळत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. दररोज नागरिकांना नियम पाळण्यासाठी सांगणारे मनुष्यबळ सरकारकडे उपलब्ध नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावर एक युक्ती लढवली. जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेली पोलीस बॉईज संघटनेचा तरुणांना या कामासाठी तयार केले.

संघटनेतील सर्व तरूण हे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची मुले आहेत. यातील बरेच विद्यार्थी उच्चशिक्षित तरूण आहेत. कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे ते सध्या घरी होते. मात्र, पोलीस अधीक्षकांनी त्यांना मदतीची हाक देताच हे सर्व तरुण विनामूल्य सेवा देण्यासाठी तयार झाले. या तरुणांना एक ओळख पत्र देण्यात आले आहे. तरूणांची आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी औषध देण्यात आली, तसेच त्यांना मास्क आणि सॅनिटाइझर देण्यात आले आहेत. दररोज शहरातील सर्वात ज्यास्त गर्दीचे ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे तरूण जात आहेत. हे तरूण शासकीय काम संपेपर्यंत नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतींने सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी, मास्क घालण्यासाठी तसेच त्यांचा तापमान मोजण्याचे आणि ज्यांना बँकेचे फॉर्म भरणे जमत नसेल त्यांचे फॉर्म भरून देणे आणि काउंटरच्या गरजेनुसार लोकांना आत जाऊ देणे, असे सर्व कामे हे मोठ्या आनंदाने आणि आपले कर्तव्य समजून पार पाडत आहेत.

Last Updated : Jun 23, 2020, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details