बीड- शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात भरदिवसा झालेल्या हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अज्ञात तीन ते चार मारेकरऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून शेख शाहीद शेख सत्तार ( वय 24 वर्षे) या तरुणाचा खून केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेली माहिती अशी, शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 वर्षे, रा. खासबाग, बीड) याचा बसस्थानकासमोरील बँकेसमोर सायंकाळी 4 वाजता अज्ञात कारणावरून वाद झाला. यादरम्यान त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.