बीड - केज तालुक्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणामध्ये बारा जणांना ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
धक्कादायक! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून
केज तालुक्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची घटना समोर आली. प्रकरणी गावातीलच निंबाळकर कुटुंबातील बारा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्याकांडापूर्वी पीडित व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकलसुद्धा जाळून टाकण्यात आल्या. हल्लेखोर हे ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून हल्ला केला.
बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या तिघांवर हल्ला करुन खून करण्यात आला. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. प्रकरणी गावातीलच निंबाळकर कुटुंबातील बारा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्याकांडापूर्वी पीडित व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकलसुद्धा जाळून टाकण्यात आल्या. हल्लेखोर हे ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून हल्ला केला. हल्लेखोर तीस ते चाळीसजण असल्याची प्राथमिक आहे.
मध्यरात्री ३ च्या सुमारास या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली.