बीड - ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच यापुढच्या काळात आरक्षण मिळावे. अन्यथा इतरांचे आरक्षण बंद करा, असे म्हणत 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' ची घोषणा देत आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांचा सहभाग होता.
'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'; ज्यांना गरज त्यांनाच आरक्षण हवं, बीडमध्ये विराट मोर्चा
ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच यापुढच्या काळात आरक्षण मिळावे. अन्यथा इतरांचे आरक्षण बंद करा, असे म्हणत 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' ची घोषणा देत आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये असे म्हटले, की 70 वर्षांपासून आरक्षण दिले जात आहे. एका पिढीला आरक्षण दिल्यानंतर दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये. वाढीव आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पुढच्या काळात शासनाने जातीवर आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकष पाहून आरक्षण द्यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. बीड शहरातील बालाजी मंदिर येथून सुभाष रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.