बीड - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कुंभारवाडा परिसरात एका भंगारच्या दुकानाला शनिवारी दुपारी दीड वाजता अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील लोखंडाच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भंगारच्या दुकानाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बीडमध्ये भंगारच्या दुकानाला आग, आगीचे कारण अस्पष्ट
आगीची माहिती मिळतात पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील इतर दुकानदारांना सतर्क केले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्या परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत.
बीडमध्ये भंगारच्या दुकानाला आग, आगीचे कारण अस्पष्ट
आगीची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील इतर दुकानदारांना सतर्क केले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्या परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. भंगाराचे दुकान देखील बंद होते. ही आग कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन विभागाचे अधिकारी घेत आहे. या आगीत किती नुकसान झाले आहे व हे भंगार दुकान मालकाचे नाव काय हे समजू शकले नाही. सध्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.