बीड - तलावातील गाळ काढताना ७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना अवशेष सापडले आहेत. यापूर्वी २०१३ सालीही येथे विमानाचा पंखा सापडला होता.
७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष अवशेष सापडलेले विमान हे सेनादलाचे असून, १९४५ मध्ये भरकटले होते. विमान 'इमर्जन्सी लँडिंग' साठी या प्रकल्पात पाडावे लागले होते. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला होता. तर दुसरा पोहत पाण्याबाहेर आला होता. अशी माहिती आष्टी तालुक्यातील लोकांनी सांगितली आहे.
७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष तब्बल ७४ वर्षापूर्वी रोटी प्रकल्पात कोसळलेल्या या विमानाचे अवशेष गाळ काढताना सापडल्याने रूटी प्रकल्पाच्या भोवती राहणाऱ्या जुन्या व वयोवृद्ध नागरिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. ७४ वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 दरम्यान हे विमान रोटी प्रकल्पात कोसळले होते. तेव्हा त्यातील एक सैनिक बचावला होता. त्या सैनिकाला येथील ग्रामस्थ रामराव पाटील जासूद यांनी आपल्या बैलगाडीतून दवाखान्यात नेले होते.
७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष १६ बैलगाड्या लावून विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न-
१९४७ दरम्यान आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. अशा परिस्थितीत रूटी प्रकल्पाभोवती राहणाऱ्या नागरिकांनी 16 बैलगाड्या लावून मोठे विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न करणार्यांमध्ये वसंत अष्टेकर व मुबारक चाऊस या दोघांचा समावेश होता. मात्र, तेव्हा ते विमान बाहेर काढण्यास अपयश आले होते.