बीड -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई निषेधार्थ परळी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच उद्या गुरूवारी (दि. 26 सप्टेंबर) परळी बंदची हाक पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना मिळणार्या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजप सरकारने सुडबुध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात पवारांवर ही कारवाई केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा -राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
परळीच्या शिवाजी चौकात हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना मिळणार्या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजप सरकारने सुडबुध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात पवारांवर ही कारवाई केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सुमारे तासभर चाललेल्या या निदर्शनात युवक नेते अजय मुंंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, नगरसेवक अनिल अष्टेकर, महिला जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.