महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेवराई तालुक्यात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर घड्याळ

गेवराई तालुक्यातील 25 ग्रामपंचयातींच्या उपसरपंच ( NCP Flag Hoisted at Gevrai Taluka Gram Panchayat ) निवडीची प्रक्रिया आज पार पडली. माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली 25 पैकी 19 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपसरपंचाची निवड झाली. राक्षसभुवन येथे उपसरपंच निवडीनंतर भव्य मिरवणुक काढून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी शक्तिप्रदर्शन केले.

By

Published : Dec 28, 2022, 11:11 PM IST

NCP Flag Hoisted at Gevrai Taluka Gram Panchayat Watch Over 19 Out of 25 Gram Panchayats
गेवराई तालुक्यात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर घड्याळ

बीड :बीडमधील गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीच्या ( NCP Flag Hoisted at Gevrai Taluka Gram Panchayat ) घड्याळाचा गजर पाहायला मिळाला. 76 पैकी 51 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व निर्माण झाले आहे. उपसरपंच निवडीत 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. माजी आ.अमरसिंह पंडित ( 19 Out of 25 Gram Panchayats ) व विजयसिंह पंडित यांनी सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. उपसरपंच निवडीच्या पहिल्या दिवशी गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर सर्वत्र ऐकण्यास मिळाला.

गेवराई तालुक्यात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर घड्याळ

गेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियागेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. 76 पैकी 51 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व राखले. ग्रामीण मतदारांनी माजी आ.अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून आले. उपसरपंच निवडीचा पहिला टप्पा आज पार पडला, पहिल्या टप्प्यासाठी 26 ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचांची निवड प्रक्रिया घेण्यात आली.

सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेमुधापुरी येथील सरपंच ऐनवेळी आजारी पडल्यामुळे तेथील उपसरपंच निवड प्रक्रिया लांबणीवर पडली, त्यामुळे बुधवारी पार पडलेल्या 25 पैकी 19 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपसरपंच निवडून आले. राक्षसभुवन, खळेगाव, राजपिंपरी यांसारख्या ग्रामपंचायतींमध्ये जनतेतून निवडून आलेले सरपंच जरी इतर पक्षाचे असले तरीही ग्रामपंचायत सदस्यांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे अधिकची असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपसरपंच त्याठिकाणी निवडून आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असल्यामुळे अनेक ठिकाणी इतर पक्षाचा सरपंच असतानाही उपसरपंच मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झाला आहे.

गेवराई तालुक्यात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर घड्याळ

हे आहेत विजयी उमेदवारआज सौ.विमलबाई तात्यासाहेब नाटकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून भव्य मिरवणुक काढली. अर्धपिंपरी -छगाबाई दत्तू गोरे, आहेर वाहेगाव -वाहेदखाँ पठाण, किनगाव -ज्ञानेश्वर चाळक, कोल्हेर- पुष्पा डिगांबर येवले, गुंतेगाव - राजकन्या कैलास गोर्डे, ताकडगाव - सय्यद जावेद, बोरगाव - राहुल जाधव, राजपिंपरी - प्रभाकर ढोकळे, एरंडगाव- दत्तप्रसाद जाधव, कोळगाव- कोमल रावसाहेब धोत्रे.

हे आहेत विजयी उमेदवारखळेगाव -सचिन आहेर, खामगाव- गौतम पारे, चोरपूरी- शशिकला उत्तम शेळके, धोंडराई- बद्री जाधव, पोखरी -सरुबाई सुदामराव मोघे, लुखामसला- गंगूबाई राजाभाऊ व्हरकटे, वडगाव ढोक- बाळासाहेब वारूळे आणि सुशी - कविता गजानन मोंढे या 19 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपसरपंचांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश प्राप्त झाले आहे. नवनिर्वाचित उपसरपंचांना त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details