बीड- जिल्ह्यात सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र, त्यातही पाणी मुबलक नाही. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून माजलगाव धरणात २ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जायकवाडीतून माजलगाव प्रकल्पात २ टीएमसी पाणी सोडा - जयदत्त क्षीरसागर
सध्याचा पाणीसाठा पाहता पाऊस पडेपर्यंत हा पाणीसाठा पुरणार नाही. माजलगाव आणि बीड शहराची लोकसंख्या तसेच लागणारे पाणी पाहता यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पैठण येथील उजव्या कालव्यातून २ टी.एम.सी. पाणी सोडण्यात यावे.
माजलगाव धरणात ८४ एम.एम.क्यू. म्हणजेच २.९६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. यामधून रोज १२ एम. एम. म्हणजेच २२३ एम.एम.क्यू. पाण्याचे बाष्पीभवन होते. या धरणावरून माजलगाव आणि बीड या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा होतो. हा सध्याचा पाणीसाठा पाहता पाऊस पडेपर्यंत हा पाणीसाठा पुरणार नाही. माजलगाव आणि बीड शहराची लोकसंख्या तसेच लागणारे पाणी पाहता यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पैठण येथील उजव्या कालव्यातून २ टी.एम.सी. पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे माजलगाव धरणात १ टी.एम.सी. पाणी पोहोचेल आणि या दोन शहरांना पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल. यासंबंधीत मुख्यमंत्र्यांनी संबंधीत विभागाला आदेश देण्याची मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.