महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही, मनोज जरांगेंची गर्जना

Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीनंतर आता मराठ्यांचं (Maratha Reservation Protest) वादळ मुंबईत धडकणार आहे. 20 जानेवारी रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आमदार आणि खासदार समाजाची साथ देणार नाहीत त्यांना यापुढे दारातही उभे करून घेऊ नका, असा इशारा जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil Beed Sabha) दिला.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 6:48 PM IST

Updated : Dec 23, 2023, 7:32 PM IST

बीड Manoj Jarange Patil :मराठा आरक्षण आंदोलनाबाबत (Maratha Reservation Protest) पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (23 डिसेंबर) बीडमध्ये (Manoj Jarange Patil Beed Sabha) मराठा समाजाच्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. येत्या 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मुंबईत आमरण उपोषण : मुंबईत 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळं 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी मला भेटायला मुंबईत यायचं आहे. .आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा करतानाच स्वत: त्यांच्या आंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.

अंतरवलीमधून मुंबईला पायी जाणार : अंतरवली सराटीतून मुंबईकडं पायी निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मतं घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. दहा बारा दिवस मिळत आहेत ते सरकारनं बघावं. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय.

हिंसा करायची नाही : पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडं कूच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही, मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेत जायचं, शांततेत यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागं यायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. ठरलं! मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण; सरकारला दिला इशारा
  2. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली
  3. मनोज जरांगे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत, 201 जेसीबीमधून फुलांची उधळण
Last Updated : Dec 23, 2023, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details