बीड :बीडच्या परळी मतदारसंघात मुंडे ( Munde in Parli Constituency of Beed ) बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायतीमधील प्राथमिक निकाल हाती ( Preliminary result in Gram Panchayat ) आले. त्यामध्ये परळी मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सकारात्मक निकाल हाती येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या घरासमोर विजयी जल्लोषाची तयारी करण्यात आली असून धनंजय मुंडे सहभागी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले.
victory of NCP : परळी मतदारसंघात भाजपला धक्का देत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड
परळी मतदारसंघात भाजपला धक्का ( blow to BJP in Parli Constituency ) देत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड (victory of NCP ). ग्रामपंचायतच्या विजय जल्लोषात धनंजय मुंडे सहभागी (victory celebration of Gram Panchayat ) झाले. जिल्ह्यात प्राथमिक निकालात राष्ट्रवादीलाच मतदारांची पसंती ( NCP is preferred by voters ) असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पार्टीला घवघवीत यश : वैद्यनाथ कारखाना स्व.गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ ज्या ठिकाणी आहे. त्या पांगरी ग्रामपंचायत सह महत्वाच्या मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घेत भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. परळी मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार राष्ट्रवादी पार्टीला घवघवीत यश येत असल्याची कबुली राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळी तालुकाच नाही तर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.