महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

शहीद जवानांच्या पत्नीला शासनाकडून दोन हेक्टर जमीन द्यावी, अशी  योजना आहे. मात्र, या दोन हेक्टर जमिनीसाठी बीडच्या एका शहीद जवानाची पत्नी मागील एका वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडे चकरा मारतेय. जमीन दिली नाहीच, मात्र विरपत्नीच्या अर्जाची बीड जिल्हा प्रशासनाने साधी दाखलही घेतली नाही.

negligence of district administration
गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट

By

Published : Feb 7, 2020, 9:52 PM IST

बीड- शहीद जवानांच्या पत्नीला शासनाकडून दोन हेक्टर जमीन द्यावी, अशी योजना आहे. मात्र, या दोन हेक्टर जमिनीसाठी बीडच्या एका शहीद जवानाची पत्नी मागील एका वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडे चकरा मारतेय. जमीन दिली नाहीच, मात्र विरपत्नीच्या अर्जाची बीड जिल्हा प्रशासनाने साधी दाखलही घेतली नाही. विशेष म्हणजे बीडमधून असे १० ते १५ वीरपत्‍नींचे गायरान जमिनीसाठीचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आहेत. आम्हाला न्याय मिळणार की, नाही असा सवाल विरपत्नी भाग्यश्री राख यांनी उपस्थित केला आहे.

गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट

भाग्यश्री राख यांचे पती तुकाराम श्रीमंत राख हे सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना १ मे २०१० मध्ये शहीद झाले. शहीद जवानांच्या विधवा पत्नीस शासनाकडून दोन हेक्टर जमीन देण्याचे धोरण आहे. या बाबतचा जी.आर. देखील आहे. या शासन आदेशानुसार भाग्यश्री राख या वीरपत्नी मागील एक वर्षापासून गायरान जमिनीची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव देखील जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे. असे असूनही भाग्यश्री राख यांना मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडे चकरा माराव्या लागत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करुनही आम्हाला न्याय मिळत नाही. अशी खंत वीरपत्नी भाग्यश्री राख यांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा - अंधश्रद्धा : पैशांचा पाऊस पाडून विधवा महिलांवर अत्याचार

वीरपत्नी भाग्यश्री राख यांच्यासह बीड जिल्ह्यात दहा ते पंधरा वीरपत्नी महिलांना गायरान जमीन देण्याचे प्रस्ताव धूळखात पडले असल्याचे समोर येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - पु्ण्यातील मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ABOUT THE AUTHOR

...view details