महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लज्जास्पद हातवारे आणि अश्लील भाषेत बोलून वांरवार महिलेला त्रास दिल्यामुळे जिल्हा परिषदच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पालवे असे गुन्हा दाखल झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे.

By

Published : Mar 13, 2020, 3:29 AM IST

District Animal Husbandry Officer lodged a crime in a breach case
जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड - लज्जास्पद हातवारे आणि अश्लील भाषेत बोलून वांरवार महिलेला त्रास दिल्यामुळे जिल्हा परिषदच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पालवे असे गुन्हा दाखल झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - केरळमधील इंटरनेट क्षमता ३० ते ४० टक्क्यांनी वाढवणार; 'कोरोना'मुळे निर्णय

सदर महिला ही पशुसंवर्धन विभागातच कनिष्ठ सहाय्यक कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी 6 जून 2019 ला महिलेने तत्कालीन जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली होती. यानंतर ती तक्रार विशाखा समितीकडे वर्ग करण्यात आली होती. समितीचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी संतोष पालवेच्या विरोधात गुन्हा करण्यात आला. लज्जास्पद हातवारे व अश्लील भाषेचा वापर करून वारंवार त्रास दिल्याची तक्रार महिलेने केली आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरीचा आरोप करून निलंबित केल्याची तक्रारही महिलेने केली असून. कार्यालयात काम करत नसल्याचे वरिष्ठांना सांगून माझ्याविरुद्ध कट रचून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details