महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Angry Farmers : शेतकऱ्यांचा संतप्त सवाल, एका पगारासाठी अधिकारी ओरडतो आम्ही पीक गेले म्हणुन दिवाळी करायची का

आमची पीक गेली म्हणून आम्ही दिवाळी साजरी करायची का ? शेतकऱ्याचा सरकारला संतप्त सवाल ( Farmers angry question to government ). अधिकारी एक पगार नाही झाली तर ओरडतो. मग आम्ही बारा महिने कसं पोट भरायचं. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी.

Angry Farmers
शेतकऱ्याचा सरकारला संतप्त सवाल

By

Published : Oct 17, 2022, 10:30 AM IST

Updated : Oct 17, 2022, 12:50 PM IST

बीड: बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वच महसूल मंडळातील गावांना मागील आठ दिवस झोडपल्याने काढणीस आलेले सोयाबीनची माती व कापसाच्या वाती झाल्या. तर कांदा, तुर, या पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या ( Rabi season sorghum sowings failed ) तर काहीना दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने बळीराजा पूर्णपणे उध्वस्त झाला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीचे विधानसभा सदस्य बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस, मा.आ. भीमराव धोंडे यांच्या सह प्रशासकीय अधिकारी यांनी पहाणी केली. जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्याचा सरकारला संतप्त सवाल


अस्मानी संकटाने उध्वस्त : सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना यावर्षी परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केले आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन सह कांदा, तूर कापूस या पिकांचे नुकसान झाले. शेताला तलावाचे स्वरूप आहे उरले सुरले पिके चिखला मध्ये शिरून शेतकरी काढू लागले आहेत. अस्मानी संकटाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीपुर्वी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटी सारखा पाऊस कोसळत होता, तर स्कायमेट या संकेत स्थळावर रिमझिम पावसाची नोंद दाखवण्यात आल्याने अधिका-यांचे डोक ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदती पासून वंचित राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. स्कायमेटच्या चुकीमुळे मागील वर्षी बीड जिल्ह्यातील आष्टा व टाकळसिंग या महसूल मंडळातील 32 गावे अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

आपण शिकलो नसल्यामुळे : बाबासाहेब शिंदे म्हणाले की ऑनलाइन आम्हाला करता येत नाही शिकलेलो असतो तर आम्ही केलं असतं. अशाप्रकारे कापसाचे गठूळ्या झाल्या आहेत सोयाबीनचे पण नुकसान झाला आहे. आपण शिकलो नसल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. सरसकट आर्थिक मदत करायला पाहिजे, ऑनलाइन हे सरकारने करायला पाहिजे किंवा मग सरसकट विमा द्यायला पाहिजे.



शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : वारंवार या कंपन्या शेतकऱ्यांना मोबाईल घ्या तुम्ही बांधावर जा बांधावरून फोटो काढून टाका. वीस घंटाच्या आत अपलोड करा किंवा 72 घंट्याचा आत अपलोड करा किंवा अशा पद्धतीचे घुमजाव या शेतकऱ्यांना विमा कंपन्या करत आहेत. शेतकऱ्यांनाही खूप त्रासदायक वाटत आहे. शेतकऱ्यांचा आता विमा कंपनी आणि सरकारला विश्वास उडाला आहे. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की बाबांनो तुम्ही शेतकऱ्याची चेष्टा करू नका, आम्हा शेतकऱ्यांचा तुम्ही अंत पाहू नका, शेतकऱ्याचा अंत बघण्याची ही वेळ नाही. आज रोजी शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.

हातात तोंडाशी आलेला घास गेला : शेतातली पिके पूर्णपणे सडून गेली आहेत. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पूर्णपणे निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे विमा कंपन्यांनी, आणि शासनाने कुठल्याही बाबतीची, वाट न बघता, याला ऑनलाईनचा कुठलाही नियम न लावता, शेतकऱ्यांना सरसकट मदत तर करावीच, पण त्यासोबत जो पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा, सरसकट विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमानतळ देण्यात यावा. जर या विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली नाही तर, येत्या आठवड्यामध्ये लवकरात लवकर आम्ही शिवसेना आणि किसान सेनेच्या वतीने विमा कंपनीच्या कार्यालयावर आंदोलने करणार.





कापसाच्या वाती झाल्या :
बिभिषण शिंदे शेतकरी म्हणाले की, कापसाच्या वाती झाल्या आहेत. लोकांनी भूमका उठवली होती की कापूस पंधरा हजार आणि वीस हजार भाव मिळलं सरकार काहीही भूमिका उठवतयं भूमिका उठवल्यामुळे दहा दहा हजार रुपयांच्या फवारण्या करायला लागले. तीन हजार रुपये क्विंटलचे खत टाकायला लागले एवढा पैसा काय शेतकऱ्या जवळ असतो का ? त्याला कुणीतरी सावकारच बघावा लागतो, पहिला एकच झाला आता पुढेही सावकार बघायची वेळ आलीय. सरकारचं दोन वर्ष एकदाही अनुदान मिळालं नाही आठ दिवसाच्या सरकारने विमा द्यावा.

दिवाळी साजरी करायची कशी: मायबाप सरकार ही दिवाळी साजरी करायची कशी हे पीक गेलं म्हणून आनंद साजरा करायचा का ? दुःखात करायची की सुखात करायची हे तरी सांगा आम्हाला. हे दुःख शेतकऱ्याला झाला आहे त्यांना आपण अनुदान द्यावं, विमा द्यावा म्हणजे शेतकरी दीपावली साजरी करेल. एक तर लोकांचे पैसे काढले आहेत त्यांनी, काहीतरी करून खाते मुलांच्या शिक्षणाला खर्च येतोय. दवाखाने असतात अनेक भानगडी असतात शेतकऱ्यामागे, अधिकाऱ्याची एक पगार जर नाही झाली तर ते ओरडतात मग आम्ही कसं ओरडायचं, आम्ही बारा महिने कसं पोट भरायचं. महिने याच्यावरच पोट भरायचं आम्हाला काय दुसरं काही येतोय का ? सरकारला कळत नाही का ? लाख लाख दोन दोन लाख रुपये महिना देतात. त्यांचा विचार ते करतात पण शेतकऱ्याचा विचार कोणी करायचा ? सरकारने शेतकऱ्याला समजून घ्यायला पाहिजे.


शेतातुन ऑनलाईन फोटोची सक्ती :परतीच्या पावसानं कापसाची सगळी वाट लागली आहे. कंपनी सांगते की रानात जाऊन ऑनलाईन फोटो काढा, आमच्यापाशी मोबाईल ही नाही आणि काही पण नाही, द्यायचं कशावर आणि सोयाबीन पण केली आहे. फवारणी करायला व्याजाने पैसे घेतले आहेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सह विमा द्यावा. असे मत नानाभाऊ शिंदे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Oct 17, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details