महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच कोटींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस गजाआड

माजलगाव नगरपालिकेतील अपहाराप्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बुधवारी अटक झाली आहे. त्यांच्यासोबत मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांनाही बुधवारी पुणे येथून अटक करण्यात आली.

सहाल चाऊस
सहाल चाऊस

By

Published : Mar 5, 2020, 5:04 AM IST

बीड - जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेला 14 व्या वित्त आयोगातून आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजलगाव येथील नगरपालिकेचे अध्यक्ष सहाल चाऊस यांना बुधवारी अटक झाली आहे. यात मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना बुधवारी पुणे येथून अटक करण्यात आली होती. तर, त्यांच्या जबाबावरून नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना सहआरोपी म्हणून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहितीनुसार, नगर पालिकेतील 5 कोटी 57 लाख रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी 3 मुख्याधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजलगाव नगर परिषदेला १४ व्या वित्त आयोगासह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीतून जवळपास 5 कोटी 57 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एका नगरसेवकाने केल्याने चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावरून डिसेंबर 2019 मध्ये प्रथम 1 कोटी 44 लाख रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्याधिकारी बी.सी. गावीत यांच्यासह 3 जणांवर तर, 8 दिवसानंतर पुन्हा 4 कोटी 13 लाख रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी बी.सी. गावीत, हरीकल्याण एल्गट्टी, लक्ष्मण राठोड या 3 मुख्याधिकाऱ्यांसह लेखापाल अशोक रांजवन, अशोक कुलकर्णी, आनंद हजारे, सुर्यकांत सूर्यवंशी अशा 7 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना अटक करून जमीन मंजूर झाला होता. परंतु, इतर संशयित आरोपी फरार होते. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पुणे येथून अटक केली.

हेही वाचा -बनावट स्वाक्षरी प्रकरणी संगीता ठोंबरेंना दिलासा नाही; गुन्हा कायम राहणार

यातील श्री.एल्गट्टी यांनी दिलेल्या जबाबावरून नगर परिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी नगर परिषदेतून ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. यावेळी आर्थीक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चाऊस यांना अटक केली. नगराध्यक्ष चाऊस यांना पोलिसांनी अटक केल्याची बातमी पसरताच शहरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यांना शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ठेवण्यात आल्याने बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा -वाऱ्यावर सोडत आई-वडिलांनी केले दुसरे लग्न; बीडच्या स्वाधार गृहात राहून 'ती'ने पूर्ण केली बारावी

ABOUT THE AUTHOR

...view details