बीड - यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरपट झाल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले. या घडीला 16 हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. बीड जिल्ह्यात एकूण 26 कापूस खरेदी केंद्र आहेत.
कपाशी उत्पादक चिंतेत; 16 हजार शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचे प्रशासनासमोर आव्हान
मागील चार दिवसांपूर्वी पावसामुळे कापूस खरेदी बंद होती. शेतकऱ्यांच्या कापसाचे पंधरा-पंधरा दिवस मापे झाली नसल्याची वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली. अचानक आलेले कोरोनाचे संकट व प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 29 लाख 57 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

येत्या पंधरा दिवसात उर्वरित शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस आला तर कापूस खरेदी करणे अशक्य होणार आहे. मध्यंतरीच्या काळात कापूस खरेदी करण्याचे काम प्रचंड प्रमाणात मंदावले होते. त्यामुळे अद्यापपर्यंत पूर्णतः कापूस खरेदी होऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात आहे. याचा फटका बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.