..तर या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील - पंकजाताई मुंडे
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंकजा मुंडे यावर ट्विट करत ' देर आये पर दुरुस्त नहीं आये', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल, असा टोला लगावला आहे.
परळी (बीड) -राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, पण हे सरकारला जरी उशीरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामे घेतले तरच दुरुस्त म्हणता येईल, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.