महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्य संमेलन : 'फादर दिब्रिटोंची निवड रद्द केल्यास ख्रिश्चन समाजाचा मतदानावर बहिष्कार'

कोणाच्याही दबावामुळे फादर दिब्रीटो यांची निवड रद्द केल्यास किंवा त्यांना पद सोडण्यास भाग पाडल्यास व त्यांचा अपमान केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा आशिष शिंदे यांनी दिला आहे.

आशिष शिंदे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ अध्यक्ष

By

Published : Sep 25, 2019, 9:33 PM IST

बीड - उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड करणारे ज्येष्ठ साहित्यीक आहेत. मात्र, काही जणांच्या या निवडीमुळे पोटात दुखू लागले आहे, असे वक्तव्य अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले आहे.

आशिष शिंदे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ अध्यक्ष

हेही वाचा -माझी लढाई व्यक्तीशी नाही, तर प्रवृत्तीशी - पंकजा मुंडे

कोणाच्याही दबावामुळे फादर दिब्रिटो यांची निवड रद्द केल्यास किंवा त्यांना पद सोडण्यास भाग पाडल्यास व त्यांचा अपमान केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा आशिष शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचा - शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, की विशेष म्हणजे साहित्याचा कोणताही गंध नसलेले व स्वतःचे एकही पुस्तक प्रसिद्ध नसणारे काहीजण या निवडीला जातीय रंग देवू पाहत आहेत. हे आपल्या परोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्तांप्रमाणेच, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व पर्यावरण यावर गाढा अभ्यास व लिखाण केले आहे. म्हणून त्यांना आंळदी येथे सरकारने सन्मानित केले आहे. त्यांचे लिखान हे ख्रिस्ती धर्माच्या पलीकडील आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी अभ्यास करावा व मग बोलावे, असे आव्हानही शिंदे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details