बीड- माजलगावमधील कालिका नगर येथे शनिवारी एकाने भावजईसह तीच्या दोन भावांवर आणि लहान मुलांवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १ जण गंभीर, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला घरगुती वादातून झाल्याचे समते. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून भावाच्या कुटुंबावर अॅसिड हल्ला, एक गंभीर
माजलगावमधील कालिका नगर येथे शनिवारी एकाने भावजईसह तीच्या दोन भावांवर आणि लहान मुलांवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शुल्लक भांडणातही अॅसिडचा वापर होत असल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माजलगाव शहरातील कालिका नगर येथे राहणाऱ्या अहमद जैनुद्दीन जर्गर, नजीब जर्गर व इर्शाद जर्गर या तीन भावांचा जागेवरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी इर्शादचे मेहुणे गेले होते. अहमद आणि नजीब यांनी यावेळी समीर यांच्यासह इर्शादच्या कुटुंबीयांवर चक्क अॅसिड हल्ला केला. यात पाच जण जखमी झाले आहेत.
या हल्यात समीर शेख मेहबूब शेख (वय ३५ वर्षे) शेख मकसूद (वय ३८ वर्षे), दिना इर्शाद जर्गर (वय ८ वर्षे) व अलशफात इर्शाद जर्गर (वय १५ वर्षे) यासह रेश्मा ईर्शाद जर्गर (वय ३३ वर्षे) यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.