महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये रविवारी आढळले 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 39

बीड जिल्ह्यात आजघडीला एकूण 39 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत व त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

By

Published : May 25, 2020, 8:16 AM IST

beed corona
बीडमध्ये रविवारी आढळले 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह

बीड- पुन्हा एकदा रविवारी बीडला कोरोनाने धक्का दिला असून पाठवण्यात आलेल्या 40 स्वॅब पैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 33 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना पाय पसरवत आहे. रविवारी बीड जिल्ह्यातून एकूण 40 स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. यापैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील साखरे बोरगाव येथील 3 जण यामध्ये 48 वर्षीय पुरुष 13 वर्षीय मुलगी व 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पाटोदा शहरातील 40 वर्षीय पुरुष तर वडवणी येथील 36 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिला रविवारी कोरोना पॉझिटिव आढळून आली.

विशेष म्हणजे वरील सर्व रविवारी सापडलेले रुग्ण हे मुंबई येथून आलेले असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात आजघडीला एकूण 39 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत व त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details