महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव टिप्पर आणि मोटारसायकलची जोरदार धडक; ३ जण जागीच ठार - धुळ्यातील अपघात

वाळूची वाहतूक करणारा टिप्पर आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाली. यात मोटरसायकलीवरील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात
अपघात

By

Published : Aug 9, 2020, 7:28 PM IST

बीड - वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्याजवळ ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

अंबाजोगाई-पठाण मांडावा मार्गावर असलेल्या काळवीट तांडा येथून वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने (क्र. MH -25 U 2444) मोटारसायकलला (क्र. MH-13 BD 5684) जोराची धडक दिली. या घटनेत मोटार सायकलवरील तिघे जण जागीच ठार झाले. हे तिघेही परळी तालुक्यातील वसवाडी वानटाकळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पप्पू महादेव गायके (३७), पप्पू जनार्दन गायके (३०), विठ्ठल मुंजा गायके (२३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -विशेष मुलाखत: गांधीजींचा 'चले जाव'चा नारा आणि क्रांतीदिनाची पार्श्वभूमी

ABOUT THE AUTHOR

...view details