महाराष्ट्र

maharashtra

'या' निवडणुकीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला मिळाली होती कलाटणी!

By

Published : Sep 21, 2019, 3:26 PM IST

1990 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसचे पंडितराव दौंड यांना ब्रेक दिला होता. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत तेव्हाच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून झाली होती. या निवडणुकीनंतर पुढील चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. याच विधानसभा निवडणुकीने गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला नवे वळण निर्माण करून दिले होते.

गोपीनाथ मुंडे

बीड - जिल्ह्याच्या राजकारणात सतत अस्थिरता राहिलेली आहे. चिरकाळ सत्ता कोण्या एकाच्या हातात न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याचे यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेले आहे. या पैकीच एक 1990 ची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने आजही बीड जिल्ह्यातील मतदारांच्या स्मरणात आहे.

हेही वाचा - '220 प्लस जागा निवडूण येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'

1990 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसचे पंडितराव दौंड यांना ब्रेक दिला होता. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत तेव्हाच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून झाली होती. या निवडणुकीनंतर पुढील चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. याच विधानसभा निवडणुकीने गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला नवे वळण निर्माण करून दिले होते.

हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी

रेनापूर मतदारसंघ अस्तित्वात असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व काँग्रेसचे पंडितराव दौंड यांच्यात 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांचा 2 हजार 615 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे तो पराभव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रेनापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे जोमात कामाला लागले होते.

हेही वाचा - 'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

तरुण नेतृत्व असल्यामुळे रेणापूर विधानसभा मतदारसंघातील तेव्हाचे अनेक नेते गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये आले होते. पंडितराव दौंड काँग्रेसकडून 1990 मध्ये रेनापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा उभे राहिले. सत्तेचा काळ असल्याने पंडितराव दौंड यांचा चांगलाच बोलबाला होता. गोपीनाथ मुंडे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी 5 हजार 990 मतांनी पंडितराव दौंड यांचा पराभव केला होता. 1990च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, या निवडणुकीनंतर पुढील चार पंचवार्षिक म्हणजेच वीस वर्ष गोपीनाथ मुंडे यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details