महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Headmaster Attack : छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापक, शिपायावर तरुणाने केला तलवारीने हल्ला

औरंगाबादमध्ये कन्नड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या ( Karmaveer Kakasaheb Deshmukh High School ) मुख्याध्यापक व शिपायावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला ( Aurangabad Headmaster Attack ) आहे.

छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापक, सेवकावर तरुणाने केला तलवारीने हल्ला
छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापक, सेवकावर तरुणाने केला तलवारीने हल्ला

By

Published : Feb 4, 2022, 7:35 PM IST

Updated : Feb 4, 2022, 9:22 PM IST

औरंगाबाद - कन्नड शहरातील मकरनपूर येथील एका तरुणाने कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे ( Karmaveer Kakasaheb Deshmukh High School ) मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण व सेवक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. हा आरोपी शालेय परिसरातील मुलींना त्रास देऊन त्यांची छेड काढायचा. त्याला समजावण्यासाठी मुख्याध्यापक व शिपाई गेले असता, त्याने मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला ( Aurangabad Headmaster Attack ) केला. या घटनेने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापक, शिपायावर तरुणाने केला तलवारीने हल्ला

शाळाबाह्य माथेफिरू विद्यार्थ्याने केला हल्ला..

सदरील माथेफिरू तरुण हा शाळेत येऊन शाळेतील विद्यार्थ्यांनींची सतत छेड काढत होता. अशी तक्रार विद्यार्थ्यांनींनी मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यामुळे मुख्याध्यापकाने सदर विद्यार्थ्यांस शाळा परिसरात येऊन विद्यार्थ्यांनींची छेड काढू नये अशी समज दिली. याचा मनात राग धरून सदर विद्यार्थ्यांने तलवार आणून मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केला. यात मुख्याध्यापक व शिपाई संतोष जाधव दोघेही जखमी झाले असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला करून सदर तरुण पळून गेला.

छेडछाड रोखण्यासाठी गेलेल्या मुख्याध्यापक, शिपायावर तरुणाने केला तलवारीने हल्ला

शिक्षक सुरक्षा कायदा लागू करा..

शाळा परिसरात सातत्याने शाळा बाह्य गुंड प्रवृत्तीचे तरुण येत असतात व विद्यार्थिनींची छेड काढत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना ते धमक्या देतात. वेळप्रसंगी मारहाण देखील करतात. अशा गावगुंडांपासून विद्यार्थीनी व शिक्षकांचे सरंक्षण होणे गरजेचे आहे. असेच प्रकार परीक्षा कालावधीमध्ये देखील होत असतात. विद्यार्थ्यांना कॉपी करण्या पासून, गैरप्रकार करण्यापासून रोखणाऱ्या शिक्षकांना देखील असे विद्यार्थी धमक्या देतात. त्यामुळे शिक्षक यांना घाबरून असतात. भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना शिकता आले पाहिजे. आजची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, विद्यार्थी कुठे चुकला असेल तर शिक्षक त्याला समज देखील देऊ शकत नाही. विद्यार्थी त्याचा राग मनात ठेवून विद्यार्थी गावगुंडांना घेऊन येतात व शिक्षकांना धमक्या देतात. यासाठी शिक्षक सुरक्षा कायदा लागू करावा अशी आम्ही सातत्याने मागणी करीत होतोत. भविष्यात अशा घटना घडू नये याकरिता ह्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणास लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी. अशी मागणी शिक्षक क्रांती संघटनेचे मनोज पाटील यांनी केली आहे.

Last Updated : Feb 4, 2022, 9:22 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details