महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Youth Collect Garbage : उच्चशिक्षित तरुणांनी घेतली पर्यटन स्थळांवरील कचरा गोळा करण्याची जबाबदारी; औरंगाबादमधील तरुणांचा उपक्रम

पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पर्यटन स्थळावरील कचरा शहराची प्रतिमा मलिन करतो. ( Garbage in Aurangabad ) यामुळे पर्यटन स्थळे स्वच्छ करण्याची जबाबदारी आता शहरातील उच्छाशिक्षित तरुण तरुणींच्या औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपने घेतली आहे. ( Plogers Group Aurangabad ) प्रत्येक रविवारी हा ग्रुप पर्यटन स्थळावरील कचरा गोळा करतो आणि यानंतर महानगर पालिकेकडे हा कचरा जमा केला जातो. ( Plogers Group Collect Garbage Aurangabd )

By

Published : Feb 28, 2022, 1:36 PM IST

Aurangabad Youth Collect Garbage
औरंगाबादमधील तरुणांचा उपक्रम

औरंगाबाद -पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पर्यटन स्थळावरील कचरा शहराची प्रतिमा मलिन करतो. ( Garbage in Aurangabad ) यामुळे पर्यटन स्थळे स्वच्छ करण्याची जबाबदारी आता शहरातील उच्छाशिक्षित तरुण तरुणींच्या औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपने घेतली आहे. ( Plogers Group Aurangabad ) प्रत्येक रविवारी हा ग्रुप पर्यटन स्थळावरील कचरा गोळा करतो आणि यानंतर महानगर पालिकेकडे हा कचरा जमा केला जातो. ( Plogers Group Collect Garbage Aurangabd ) सुरुवातीला हिणवल्या जाणाऱ्या या मुलांचे आता सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. ( Aurangabad Youth Collect Garbage )

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

14 महिन्यांपासून काम सुरू -

पर्यटनाच्या राजधानीत पर्यटन स्थळांवरील वाढते प्लास्टिक, दारुच्या बाटल्या यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांमध्ये शहराची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपच्या वतीने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी प्रत्येक रविवारी प्लास्टिक गोळा केले जाते. त्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते आहे. गोळा केलेले प्लास्टिक कचरा संकलित केला जातो. शहरातील विविध ठिकाणी गेल्या १४ महिन्यांपासुन हा ग्रुप काम करत आहे.

400 सदस्य -

शहरातील उच्चशिक्षित निखिल खंडेलवाल या तरुणाने शहरातील पर्यटन स्थळावरील क्च‌रा समस्येवर मार्च २०२०मध्ये औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला निखिल हा एकटाच हे काम करू लागला. त्यानंतर त्याचे भाऊ सहभागी झाले. हळुहळु ग्रुपची माहिती प्रत्येकाला मिळत गेली. आता ग्रुपमध्ये ४०० हुन अधिक सदस्य झाले आहेत. शहरातील गोगाबाबा टेकडी, वाल्मी तलाव हिमायतबाग, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, साई टेकडी, कॅनॉट प्लेस, आदी भागांतील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन ग्रुपचे सदस्य करत आहेत. हिमायत बागेतील मोहिमेत सापडल्या आठ गोण्या प्लास्टीक तर २६४ मद्याचा बॉटल मिळाल्या.

हेही वाचा -Love Story of Ukraine President : व्होलोडिमिर झेलेन्स्कींचे 8 वर्षांच्या डेटिंगनंतर झेलेन्स्काशी झाले लग्न

घरच्यांचा होता कचरा उचलण्याला विरोध -

सोशल मीडियाच्या माध्यमाच्या माध्यमातुन औरंगाबाद प्लॉगर्स ग्रृपची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचु लागली. यामुळे अनेकांनी ग्रुपमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. सहभागी झालेल्या अनेकांच्या घरातील सदस्यांचा या कामासाठी विरोध होता. कारण उच्चशिक्षत असतांना तु शहरात कचरा वेचत फिरणार का? असा सवाल अनेकांच्या पालकांनी विचारला. मात्र, हे सामाजिक कार्य असल्याचे लक्षात येताच अनेकांच्या घराच्यांनी सहभागी होण्याची परवानगी दिली.

प्रत्येक पर्यटन स्थळावर कचरा पेटी असावी -

पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवरुन शहराला मोठे उत्पन्न तसेच रोजगार मिळतो. मात्र, अनेक पर्यटन स्थळांवर कचरा पेटी नसल्याचे दिसुन येते. यामुळे प्रत्येक पर्यटन स्थळांवर कचरा पेटी असावी. यामुळे काही प्रमाणात कचरा कमी होईल, असे औरंगाबाद प्लॉगर्स ग्रृपचे सदस्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details