महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परीक्षेत उत्तरपत्रिका न दाखवल्याने विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

ही घटना औरंगाबाद शहरातील छावणी परिसरात घडली आहे.  याप्रकरणी अज्ञात विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By

Published : Mar 25, 2019, 10:05 AM IST

संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद - दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्याने उत्तरे न दाखवल्याने एका विद्यार्थ्याने चार मित्रांच्या साथीने विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केला. ही घटना शहरातील छावणी परिसरात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश श्रावण सोळुंके असेच जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. ऋषिकेश हा दहावीचा विद्यार्थी असून पडेगाव येथील रेजिमेंटल इंग्लिश स्कूल हे त्याचे दहावी बोर्ड परीक्षेचे सेंटर होते. २१ मार्च रोजी तो पेपर देत असताना त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याने तुझी उत्तर पत्रिका दाखव असे ऋषिकेशला सांगितले. मात्र, ऋषिकेश नकार दिल्याने सहकारी मित्राने धमकी दिली होती.
२२ जानेवारी रोजी दुपारी पाच ते सहा अज्ञात मुलांनी ऋषिकेचा रस्ता आडवला व त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने वार केला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जीएस सुरवसे करीत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details