औरंगाबाद -कोरोना काळात अनेक प्रकारे नुकसान सर्वसामान्यांना अनुभवायला मिळाले. त्यात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान मोठं असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं. बोर्डाच्या ( Board Exam Start In Maharashtra ) परीक्षांमध्ये ते दिसून देखील येत आहे. लिहिण्याची सवय मोडल्याने विद्यार्थ्यांना चक्क ( Student Faced Problem In Board Exam ) पेपर लिहिताना अडचणी उद्भवत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
वेळेत पेपर लिहिता येईना -दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी वेगळा टप्पा मनाला जात आहे. दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. त्याचे दुष्परिणाम परीक्षेच्या माध्यमातून समोर येत आहेत. ऑनलाइन शिक्षण घेताना फक्त पाहून आणि ऐकून विद्यार्थी शिकत होते. त्यामुळे पेनाने लिहिण्याची सवय मोडली आहे. त्यात परीक्षांमध्ये साडेतीन तासांमध्ये उत्तर लिहिणे शक्य होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. जास्त वेळ लिहिल्याने बोट दुखणे, हात दुखणे, जास्त वेळ बसल्याने कंबर आणिक पाठ दुखणे, उत्तर लिहिताना ठराविक वेळेनंतर अक्षर खराब होणे या समस्या विद्यार्थ्यांना येत असल्याने उत्तर लिहिण्यासाठी अधिकच वेळ गरजेचा असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.