गंगापूर(औरंगाबाद) -गंगापूर एसटी डेपोच्या गंगापूर-उदगीर बसच्या चालकाने बसमधील एका लहान मुलाच्या हातात चालत्या बसचे स्टेअरिंग दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात दिल्याने बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चालत्या बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात हेही वाचा -पवई तलावात गणेश विसर्जनादरम्यान मगरीचे दर्शन
- गंगापूर-उदगीर मार्गावर धावणाऱ्या एसटीचा हा व्हिडिओ -
गंगापूर-उदगीर महामार्गावर धावणाऱ्या बसचा हा व्हिडिओ आहे. 12 सप्टेंबर रोजी बस क्रमांक एमएच 13 सीयु 8110 या बसचे चालक आर. बी. शेवाळकर यांनी लहान मुलाला जवळ बसवून घेतले आणि त्यानंतर चालत्या बसचे स्टेअरिंग त्या लहान मुलाच्या हातात दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग दिल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
मनीष जवळेकर - गंगापूर आगारप्रमुख - वरिष्ठांना केला अहवाल सादर - आगारप्रमुख मनीष जवळेकर
बसचा व्हिडिओ समोर आल्यावर गंगापूर आगारप्रमुख यांना याबाबत विचारले असता, या चालकास तत्काळ ड्युटीवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आला असल्याचे मनीष जवळेकर यांनी सांगितले.
हेही वाचा -वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले