महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या ५० जागा लढवणार

राज्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू झाली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व घटक पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत.

By

Published : Oct 1, 2019, 5:24 PM IST

संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या ५० जागा लढवणार

औरंगाबाद - राज्यातील विधानसभेच्या 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने आत्तापर्यंत 42 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पुढच्या दोन दिवसात आठ उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी सांगितले. तसेच संभाजी ब्रिगेडचा प्रचार करण्यासाठी टिपू सुलतान यांचे नातू यांना आपण विनंती करणार असल्याचे देखील भानुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या ५० जागा लढवणार

हेही वाचा - रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; आमदार सुरेश लाड यांचा निवडणूक लढवण्यास नकार

संभाजी ब्रिगेड जो पक्ष आमचे ध्येय आणि धोरण मान्य करेल त्या पक्षासोबत जाऊ असे भानुसे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी संभाजी ब्रिगेड सोबत होती. मात्र, नंतर काय झाले माहीत नाही. वंचितला आमचे वावडे का आहे? असा प्रश्न भानुसे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील

विधानसभा निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड शेतकरी गरीब दुर्लक्षित अशा घटकांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काही नावे जाहीर केली होती. मात्र, तिसऱ्या टप्प्यात आणखी 14 नावे आम्ही जाहीर केली आहेत. आतापर्यंत 42 जणांची नावे जाहिर केली असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार आहोत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इतकेच नाही तर मनसेसोबत देखील आम्ही जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी आमचे काही ध्येय-धोरण आहेत ते त्या पक्षाने मान्य करावे. नंतर मान्य केले तर आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो आणि निवडणूक लढू शकतो असे देखील भानुसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

हेही वाचा - ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?

ABOUT THE AUTHOR

...view details