महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BAMU on Governor : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल यांचा निषेध ठराव मंजूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( BAMU Aurangad senate meeting ) अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. ( Resolution passed against Governor's BAMU )

By

Published : Mar 7, 2022, 4:50 PM IST

Governor's protest resolution passed at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल यांचा निषेध ठराव मंजूर

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( BAMU Aurangad senate meeting ) अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. ( Resolution passed against Governor's BAMU ) विद्यापीठाच्या अधिसभेत पहिल्यांदाच विद्यापीठाच्या कुलपती विरोधात असा ठराव मंजूर केल्याची घटना असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतिहासातील कदाचित ही पहिली घटना -

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विरोधात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत अधिसभा सुरू होताच 2 सदस्यांनी निषेधाचा ठराव मांडला त्यावरून गोंधळ झाला. मात्र, अखेर निषेधाचा ठराव मंजूर झाला. कुलगरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरू यांनी ठरावात भाग घेतला नाही. मात्र, तरी सदस्यांनी ठराव मंजूर करून घेतला. विद्यापीठात कुलपती असलेल्या राज्यपालांच्या ठरावाचा प्रस्ताव मंजूर होण्याची इतिहासातील कदाचित ही पहिली घटना असावी.

हेही वाचा -Former Mla Bhai Jagtap : एक टायपिंग मिस्टेक अन् विधानपरिषदेत पुन्हा भाई जगतापांच्या नावाची चर्चा

सन्माननीय व्यक्ती काहीही वक्तव्य करतात -

मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे असे म्हणत, अलिकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar In Pune) भर सभेत राज्यपालांचे नाव न घेता त्यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रारच केली. 'छत्रपती शिवरायांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेच्या स्वप्नातली रयतेचे राज्य निर्माण केले. (Ajit Pawar On Governor) त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत लावली. (PM Narendra Modi to visit Pune today) या महामानवांबद्दल होणारे वक्तव्य महाराष्ट्राला पटणारी नाहीत, महाराष्ट्राला ते मान्य नाही.' असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच कुणाचे नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली.

ABOUT THE AUTHOR

...view details