औरंगाबाद - पृथ्वीराज चव्हाण हा हँग झालेला नेता असल्याची टीका काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण आणि अकलेचा संबंध असता तर २०१४ ची निवडणूक जिंकली असती, असा आरोपदेखील सत्तार यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण हँग झालेला नेता - अब्दुल सत्तार
पृथ्वीराज चव्हाण हँग झालेला नेता असून त्यांचा आणि बुद्धीचा संबंध नाही. जर त्यांचा आणि अकलेचा संबंध असता तर २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला नसता आणि काँग्रेसची अशी अवस्था झाली नसती असा आरोपही त्यांनी केला.
औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही जाहीर टीका केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचार करत असताना आरोप - प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आरोप करत असताना कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. अशाच प्रकारे अब्दुल सत्तार यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त करत खालच्या स्तरावर टीका केली.
औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तारदेखील काँग्रेसवर आरोप करताना दिसत आहे. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर आता लोकसभेत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी काम करणार अशी भूमिका त्यांनी घेतली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड चौथ्या स्थानावर राहतील असा दावा करत, राज्यात सध्या काँग्रेस पिछाडीवर असल्याचे सत्तार यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे अनेक जण फिरत असले तरी आम्ही त्यांना मानणार नाही. अशोक चव्हाण चांगला माणूस आहे. मात्र, हा पृथ्वीराज चव्हाण हँग झालेला नेता आहे असून त्यांचा आणि बुद्धीचा संबंध नाही. जर त्यांचा आणि अकलेचा संबंध असता तर २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला नसता आणि काँग्रेसची अशी अवस्था झाली नसती असा आरोपही त्यांनी केला.