औरंगाबाद - तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या विवाहित महिलेला पोलीस ठाण्यातीलच निरीक्षकाने व्हाट्सएपवर अश्लील संदेश पाठविल्याची घटना जवाहरनगर पोलीस ठाण्यात घडली. या प्रकरणी महिलेने तक्रार दिली असून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलीस निरीक्षकाने पाठविला महिलेला अश्लील मेसेज, आयुक्तांचे चौकशीचे आदेश
आपल्या विरोधात महिलेने तक्रार दिल्याचे कळताच पोलीस निरीक्षक गिरमे यांनी आजारी रजेचा अर्ज दिला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहे.
हनुमंत गिरमे असे महिलेला अश्लील संदेश पाठविणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्रिमूर्ती चौक भागात राहणाऱ्या महिलेला पतीचे दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध असल्याची शंका होती. या प्रकरणी पीडित जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी निरीक्षक गिरमे यांनी महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला होता. तेंव्हापासून गिरमे हे महिलेला मेसेज करायचे मेसेजला वैतागून महिलेने गिरमे यांचा व्हाट्सएप काँटॅक्ट ब्लॉक केला. मात्र, त्यानंतरही गिरमे यांनी टेक्स्ट मेसेजही केले.