औरंगाबाद- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नात्यातील एकासोबत तिचे लग्न लावून दिले. यानंतर पीडितेला अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करणारा मेहुणा व पतीविरुद्ध एमआयडीसी, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, पीडित पंधरा वर्षीय मुलगी ही बुलडाणा जिल्ह्यातील आहे. पीडितेची मावस बहीण वाळूज एमआयडीसी परिसरात राहत आहे. मावस बहीण गर्भपात झाल्याने घरकाम करण्यासाठी मेहुणा शिवशंकर तागडे याने सन २०१८ मध्ये त्या अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले होते. काही दिवसानंतर त्या मुलीस दुचाकीवरून गावी सोडण्यासाठी निघालेल्या मेहुण्याने ए.एस.क्लब पैठण रस्त्यावर एका शेतात तिच्यावर बलात्कार करून फोटो काढले. या अत्याचाराची वाच्यता केल्यास फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. फोटो व्हायरल होण्याच्या भीतीपोटी घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची वाच्यता केली नाही.
चार लाखात बाळ विक्री
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडितेला अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करणारा मेहुणा व पतीविरुद्ध एमआयडीसी, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शिवशंकर तांगडे याने तिचे फेसबुक अकाऊंट उघडून चार लाखांत बाळ विक्रीची पोस्ट व्हायरल केली. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांनी पीडितेचा पती व तांगडे या दोघांविरुध्द क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच तिला तिचा पती व एका महिलेने घरातून हाकलून दिले. यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांच्या सल्ल्याने पीडितेला सावित्रीबाई फुले वसतिगृहात ठेवण्यात आला. दरम्यान, तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर चार महिन्यानंतर बाळ सांभाळण्यास सक्षम नसल्याचे सांगत बाळ भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल केले. यानंतर आरोपी तांगडे याने पीडितेला सोबत नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली. सततच्या अत्याचारानंतर पीडिता तीन महिन्यांपूर्वी गावी निघून गेली.
याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाणे गाठून मावस मेहुणा शिवशंकर तांगडे व पती या दोघांनी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधातून मुलगी जन्माला आल्याने या दोघांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव करीत आहेत.