महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : सोयगावमध्ये रस्त्याच्या वादातून तरूण शेतकऱ्याची हत्या

सोयगाव शिवारात असलेल्या एका शेतातील रस्त्याच्या जुन्या वादाची धुसफूस चव्हाट्यावर आली. दुपारी दोघांमध्ये समजोता घातल्यानंतर पुन्हा सायंकाळी याच वादातून शेताजवळच सोयगाव ते लिहातांडा रस्त्यावर वाद झाला. शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी एकावर कोयत्याने वार करून हत्या केली.

By

Published : Jul 19, 2021, 8:36 PM IST

Updated : Jul 19, 2021, 8:49 PM IST

शेतकरी
शेतकरी

सोयगाव (औरंगाबाद) - शेतातील रस्त्याच्या जुन्या वादातून दोघांनी कोयत्याने वार करून तरुण शेतकऱ्याची हत्या केली. तर महिला शेतकऱ्याला गंभीर केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात पिता पुत्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव शिवारात असलेल्या एका शेतातील रस्त्याच्या जुन्या वादाची धुसफूस चव्हाट्यावर आली. दुपारी दोघांमध्ये समजोता घातल्यानंतर पुन्हा सायंकाळी याच वादातून शेताजवळच सोयगाव ते लिहातांडा रस्त्यावर वाद झाला. शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी एकावर कोयत्याने वार करून हत्या केली. मयताची पत्नी वाद सोडविण्यासाठी आडवी आली असता तिलाही हातावर आणि दंडावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रस्त्याच्या वादातून तरूण शेतकऱ्याची हत्या
काय आहे प्रकरण?

सुनील आनंदा चौधरी(वय ४३) असे कोयत्याच्या वारमध्ये हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जळगावला घेवून जात असतांनाच मृत्यू झाला आहे. मृतकाची पत्नी मनीषा गंभीर अवस्थेत पाचोरा, जि. जळगाव येथे उपचार घेत आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी मनीषा चौधरी यांनी रविवारी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ज्ञानेश्वर चौधरी(वय ५०) व त्यांचा मुलगा हेमंत चौधरी (वय २१, रा. सोयगाव) या दोघांनी माझे पती सुनील चौधरी यांना शेताच्या रस्त्याजवळ अडवून जुन्या रस्त्याच्या वादातून हत्या केली. शिवाय माझ्यावरही त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात मला गंभीर जखम झाली आहे. मनीषा चौधरी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांवरही खूनाचा गुन्हा दाखल केला असून ज्ञानेश्वर चौधरी याला अटक करण्यात आले आहे. तर मुलगा हेमंत चौधरी याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुदाम शिरसाठ, जमादार संतोष पाईकराव, संदीप चव्हाण, सागर गायकवाड, रोहन शिंदे, कविता मिस्तरी, शिवदास गोपाल, रवींद्र तायडे, आदी पुढील तपास करत आहे.

Last Updated : Jul 19, 2021, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details