महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये महिलांनीच लुटले महिलेला, १,११०० रुपयांचा ऐवज लंपास

औरंगाबादमध्ये सिटी चौक परिसरात महिलांच्या टोळीने एका स्त्रीकडील १ लाख ११०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सिटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

aurangabad
aurangabad

By

Published : Mar 19, 2021, 6:01 PM IST

औरंगाबाद - सिटी चौक परिसरात महिलेच्या टोळीने एका स्त्रीच्या पिशवीतील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजार रुपये असा एकूण १ लाख ११०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा - मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भात चौकशी करुन अहवाल द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश

नक्की काय घडली घटना..
फिरदोस बेगम या आपल्या मावशीसोबत सराफा बाजारात गेल्या होत्या. यावेळी सोन्याची पोत, राणीहार आणि कर्णफुले प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. गेंदा भवनजवळ तीन बुरखाधारी महिलांपैकी एकीने त्यांना धक्का दिला. दुसरीने प्लास्टिकची पिशवी ब्लेडने कापली. त्यातील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रक्कम लंपास केली. बेगम यांनी याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा - मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details