औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे भत्ते व थकबाकी द्यावी यासह विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. लहान मुले, विचार विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका प्रवाशांना बसला आहे. बस उपलब्ध नसल्याने अनेकांना बसस्थानकामध्ये ताटकळत बसावे लागले. याचा गैरफायदा उचलत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करत प्रवाशांची लूट करत आहेत. नाइलाजास्तव प्रवाशांना जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहेत.
या आहेत प्रमुख मागणी
- 1 एप्रिल, 2016 पासून शासनप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा.
- वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्के प्रमाणे देण्यात यावा.
- घरभाडे भत्ता 8, 16 व 24 टक्क्यांप्रमाणे देण्यात यावे.
- शासनाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर देऊन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी.
हे ही वाचा -Paithan Crime : तोंडीळी बलात्कार प्रकरणातील आरोपींची ओळख पटली?