महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

By

Published : May 25, 2019, 3:29 PM IST

मृत दीपक शिंदे

औरंगाबाद- औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दीपक सोमीलाल शिंदे (वय 30 वर्षे, रा. अघोरी, ता. वैजापुर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील जनार्धन वाकळे (वय 35 वर्षे, रा. गवळीधानोरा, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटी रूग्णालयातील दृश्य


दीपक शिंदे हा रांजणगाव परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत होता. एक दिवसाची सुट्टी असल्यामुळे तो आई-वडिलांना भेटण्यासाठी अघोर येथे दुचाकी क्रमांक (एम एच 20, 3701) वरून गावाकडे गेला होता. नातेवाईकांना भेटून रांजणगावकडे येत असताना खोजेवाडी फाट्यावर समोरून आलेल्या दुचाकीसोबत अपघात झाला. अपघातात दीपकचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्याला कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले तर सुनीलवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार के.बी. देवरे हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details