महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : वन विभागाचे म्हैसमाळ येथे धाडसत्र, अवैध गावठी दारू केली नष्ट

औरंगाबाद येथील म्हैसमाळ येथे बाराशे लिटर रसायन आणि अंदाजे 50 ते 60 लिटर गावठी दारू भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26नुसार नष्ट करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

By

Published : May 14, 2020, 9:07 PM IST

दारु नष्ट करताना
दारु नष्ट करताना

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दारुविक्रीची दुकाने बंद असल्याने अनेक ठिकाणी गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू आहे. असे अड्डे शोधून पोलीस दारू नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशीच एक कारवाई म्हैसमाळ येथे वनविभागाने केली आहे.

माहिती देताना वनपरीक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक
औरंगाबादचे थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या म्हैसमाळ येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावठी दारूचा अवैध साठा जप्त करून तो नष्ट करण्याची कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास बाराशे लिटर रसायन नष्ट केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांनी दिली. खुलताबाद तालूक्यातील म्हैसमाळ येथे वनविभाग परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करुन ती विक्री होत असल्याची माहिती सुत्रांकडून वनविभागाला मिळाली. त्यानुसार औरंगाबादचे उपवनसंरक्षक सतीष वडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र यशपाल दिलपाक यांच्यासह पथकाने म्हैसमाळ येथील बालाजी मंदीर रोड व आजूबाजूच्या परीसरातील जंगलात चालणाऱ्या गावठी दारु भट्ट्यांवर छापा टाकला.

या कारवाईत अंदाजे ड्रम साठवलेले बाराशे लिटर रसायन आणि अंदाजे 50 ते 60 लिटर गावठी दारू भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26 नुसार नष्ट करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपाल कैलास जाधव, नंदू तगरे, वनरक्षक दीपक वाघ, प्रशांत निकाळजे, सोमीनाथ बरडे, व्ही. एल. कुंठे यांनी कर्तव्य बजावले तर वनपरीक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कैलास जाधव हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -औरंगाबादहून 3 हजार मजूर रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details