महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 16, 2021, 7:41 PM IST

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणामुळे पती-पत्नीची विषारी औषध घेऊन शेतात आत्महत्या

कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून पती-पत्नीने शेतात विष पिवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील खामगाव येथे ही घटना घडली.

आत्मत्या केलेले दाम्पत्य
आत्मत्या केलेले दाम्पत्य

कन्नड (औरंगाबाद) - कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून पती-पत्नीने शेतात विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील खामगाव येथे ही घटना घडली.

रामेश्वर जगन्नाथ गायके (वय 34) आणि आश्विनी रामेश्वर गायके (वय 30) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. गायके पती-पत्नी रात्री शेतात पाणी भरण्याचा निमित्ताने गेले होते. त्यावेळी त्यांनी विष घेवून आत्महत्या केली. रामेश्वर गायके हे सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी झाले होते. त्यांना यंदाही फारसे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे लोकांचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

घटनास्थळी देवगाव रंगारी पोलीस दाखल होऊन पंचानामा केला. औराळा प्राथामिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. गायके यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details