औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी बुधवारी वेरूळ लेणीसह घृष्णेश्वर मंदिरात भेट दिली. लेणी परिसरात अडीच तास त्यांनी पाहणी केली. जगाला भुरळ घालणाऱ्या वेरूळ लेणी ने हिलरी क्लिंटन यांनी भुरळ घातली. त्या काळात सुविधा नसताना साकारलेल्या कलाविष्कार पाहून अद्भुत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. क्लिंटन यांनी चार लेणी पहिल्या. त्या औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत.
वेरूळ लेणीने घातली भुरळ : जगविख्यात वेरूळ लेणीने अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हेनरी क्लिंटन यांना देखील भुरळ घातली. बुधवारी सकाळी त्या वेरूळ लेणी परिसरात दाखल झाल्या. लेणी क्रमांक 10, 16, 32 आणि 33 या चार लेण्या त्यांनी पाहिल्या. जवळपास अडीच तास त्या लेणी परिसरात त्या काळात केलेल्या अविष्काराची पाहणी करत होत्या. औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जैन, बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा दर्शन दाखवणारी एकमेव लेणी आहे. या परिसरात त्यांनी या तिन्ही प्रकारच्या लेण्या पाहून आश्चर्य व्यक्त केले. या लेण्या म्हणजे अद्भुत अविष्कार आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
विमानतळावर स्वागत : हिलरी डायना रॉडम क्लिंटन मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासाठी आणि सोबत असलेल्या सहायक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांनी हात हलवत उपस्थितांचे स्वागत स्वीकारले. आंतरराष्ट्रिय पाहुण्या असल्याने त्यांच्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्यासाठी असलेल्या वाहनांची श्वान पथक मार्फत तपासणी करण्यात आली. विशेष विमानाने आलेल्या हेनरी क्लिंटन विशेष वाहनाने खुलताबाद तालुक्याकडे रवाना झाल्या होत्या.