औरंगाबाद - जिल्ह्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस बरसत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून अता त्याला पेरणीचे वेध लागले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांमध्ये परभणी, हिंगोली येथे मध्यरात्री पावसाने दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांमध्ये परभणी, हिंगोली येथे मध्यरात्री पावसाने दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव पहायला मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाने हजेरी लावली. बुधवारी 23.70 तर गुरुवारी 17 मिमी पाऊस झाला. आज पहाटे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. तर दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने वातावरणात मोठा बदल पहायला मिळाला. शेतकऱ्यांनी सध्या होत असलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवश्यावर केलेली पेरणी वाया गेली तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱयांवर येते. त्यामुळे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तूर्तास पेरणी टाळावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.