महाराष्ट्र

maharashtra

Hillary Clinton on Aurangabad Visit : हिलरी क्लिंटन यांचे औरंगाबादमध्ये आगमन; दोन दिवस असणार दौरा

अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. अहमदाबाद येथून विशेष विमानाने दुपारी साडेतीन वाजता त्या औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या. यानंतर हेनरी क्लिंटन विशेष वाहनाने खुलताबाद तालुक्याकडे रवाना झाल्या. पुढील दोन दिवस त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

By

Published : Feb 7, 2023, 2:12 PM IST

Published : Feb 7, 2023, 2:12 PM IST

Updated : Feb 7, 2023, 7:09 PM IST

Hillary Clinton on Aurangabad Visit
अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन

हिलरी क्लिंटन यांचे औरंगाबाद विमानतळावर आगमन

औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. हिलरी डायना रॉडम क्लिंटन दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या. पुढील दोन दिवस त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

विमानतळावर स्वागत :हिलरी क्लिंटन औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्यासाठी आणि सोबत असलेल्या सहायक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांनी उपस्थितांचे स्वागत स्वीकारले. आंतरराष्ट्रीय पाहुण्या असल्याने त्यांच्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्यांच्यासाठी असलेल्या वाहनांची श्वान पथक मार्फत तपासणी करण्यात आली. विशेष विमानाने आलेल्या हेनरी क्लिंटन विशेष वाहनाने खुलताबाद तालुक्याकडे रवाना झाल्या.

असा असेल दौरा : युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. 7 फेब्रुवारीला अहमदाबाद येथून खाजगी विमानाने त्या औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या. तेथून ध्यान फार्म्स सहाजतपूर तालुका खुलताबाद येथे त्या मुक्कामी असतील. आठ फेब्रुवारीला घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर पुन्हा ध्यान फार्म्स शहाजपुर येथे मुक्काम करून 9 फेब्रुवारीला त्या पुढील ठिकाणी जाणार आहेत.

स्वागतासाठी पोलीस बंदोबस्त :अमेरिकेच्या माजी प्रथम महिला हिलरी डायना रॉडम क्लिंटन औरंगाबादेत आल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलातील 100 हून अधिक कर्मचारी 10 ते 15 पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत. प्रवास करताना रस्त्यात, मुक्कामाचे ठिकाण, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर विमानतळावर आवश्यक अशी खबरदारी देखील घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

गुजरात दौरा :गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. क्लिंटन आज दुपारी औरंगाबाद येथे पोहोचतील आणि रात्रीच्या मुक्कामासाठी खुलताबाद शहरात जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 100 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. सोमवारी, क्लिंटन यांनी दिवंगत कार्यकर्त्या इला भट्ट यांनी स्थापन केलेल्या सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशनच्या सहकार्याने बदलाशी लढण्यासाठी महिलांसाठी 50 दशलक्ष डॉलर्सचा ग्लोबल क्लायमेट रेझिलिन्स फंड जाहीर केला. हा निधी महिला आणि समुदायांना हवामान बदलाशी लढण्यासाठी सक्षम करेल आणि उपजीविकेची नवीन संसाधने आणि शिक्षण प्रदान करण्यात मदत करेल, असे त्या म्हणाल्या.

मीठ पॅन कामगारांना भेट : स्वयंरोजगार महिला संघटनेला एक ट्रेड युनियन म्हणून 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, क्लिंटन यांनी रविवारी अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झालेल्या संस्थापक आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या इला भट्ट यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. क्लिंटन यांनी सोमवारी गुजरातमधील कच्छच्या छोट्या रणमध्ये मीठ पॅन कामगारांना भेट दिली. त्यानंतर त्यांच्याकडून मीठ उत्पादनाची प्रक्रिया आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

हेही वाचा : Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारचे वरळी मतदारसंघावर विशेष लक्ष; मतदारसंघ काबीज करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू

Last Updated : Feb 7, 2023, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details