प्रशांत दामले यांची खोचक टीका औरंगाबाद : संतांची भूमी आणि ऐतिहासिक वारसा ( Land of saints and historical heritage ) लाभलेले शहर म्हणून परिचित औरंगाबाद मात्र सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नकारात्मक चर्चा होत आहे. पर्यटकांनी खराब रस्त्यांवर टीका केली असताना आता एका रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते प्रशांत दामले (film actor Prashant Damle ) यांनी उपहासात्मक टीका केली आहे. त्यांनी वैजापूर प्रवासादरम्यान आलेला अनुभव आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करत व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
नाटकासाठी दामले आले होते शहरात :मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते प्रशांत दामले हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर ते औरंगाबादेतून नाशीककडे प्रयोग करण्यासाठी शिऊर बंगल्यामार्गे जात होते. मात्र त्यांना खड्ड्यांच्या रस्त्याने प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांनी या प्रवासादरम्यान रस्त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत त्यांच्या शैलीत टीका केली आहे.
प्रशांत दामले यांची खोचक टीका अशी केली टीका :प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट केली असून ज्यात, आज संभाजीनगरचे दोन्ही प्रयोग खणखणीत झाले. रसिकांना धन्यवाद अतिशय स्वादिष्ट पण थंड जेवण आनंदाने जेवलो. ( कँटिन बंदच आहे म्हणून ) मग निघालो. औरंगाबाद वैजापूर रस्ता असा आहे. त्यामुळे जेवण आपोआप पचले. त्यांच्या शैलीत त्यांनी टीका करत राज्यकर्त्यांवर टीका केली. औरंगाबाद वैजापूर महामार्गावरील रस्त्याची अवस्था खराब आहे. अनेक वेळा या रस्त्याच्या कामाची मागणी स्थानिकांकडून केली जाते. मात्र त्यांना आश्वासनाशिवाय हाती काही लागत नाही. असा अनुभव स्थानिक नेहमीच सांगतात आता वाहनधारकांसाठी नेहमीचा झाला आहे.
आधीही दामलांनी केली होती टीका :दामले अनेक वेळा आपल्या नाटकांच्या प्रयोगासाठी औरंगाबादला येत असतात. याआधी त्यांनी संत एकनाथ रंगमंदिर च्या दुरावस्थेबाबत टीका केली होती. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि रंगमंदिर नव्याने उभ राहिले. दरम्यान कामाला दिरंगाई होत असल्याचा पाहून दामले स्वतः स्थानिक कलाकारांसह नाट्यगृहात येऊन त्यांनी टीका केली होती. त्यात शहरात रसिक प्रेक्षक असूनही कलाकारांना होणारा त्रासामुळे औरंगाबादबाबत कलाकारांच्या भावना दुखावत असून, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात होऊ शकतो, अशी शक्यता स्थानिक कलाकारांनी व्यक्त केली आहे.