महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; 5 जण होम क्वारंटाईन

कन्नड शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील 5 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्ती मंगळवारी मुंबईवरुन परत आली होती.

By

Published : Jun 11, 2020, 5:44 PM IST

Kannad Corona Update
कन्नड कोरोना अपडेट

कन्नड(औरंगाबाद) - कन्नड शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून त्याच्या संपर्कातील 5 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

कोरोनाबाधित व्यक्ती 15 दिवसांपूर्वी मुंबई येथे गेलेला. तो मंगळवारी सकाळी मुंबई येथून आला होता. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने तो घरुन थेट ग्रामीण रुग्णालयात गेला.

बुधवारी हा व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याच्या संपर्कातील पाच जणांना होम क्वरंटाइन केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी दिली.

हा कोरोनाबाधित व्यक्ती काम करत असलेल्या ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी भेट दिली.तो परिसर नगरपरिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details