महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक विम्याच्या माध्यमातून सरकार निवडणूक निधी वसूल करतंय; औरंगाबादच्या शेतकऱयांचा आरोप

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून या अडचणीच्या काळात पीक विमा काढलेल्या कंपन्या देखील शेतकऱ्यांच्या मुळाशी उठल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शनिवारपर्यंत पीक विमा कंपन्यांनी न्याय दिला नाही तर, तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

राज्यात पीक विम्याच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी केला आहे.

By

Published : Jun 5, 2019, 10:14 PM IST

औरंगाबाद -राज्यात पीक विम्याच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न देता कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून या अडचणीच्या काळात पीक विमा काढलेल्या कंपन्या देखील शेतकऱ्यांच्या मुळाशी उठल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. औरंगाबादेत अन्नदाता शेतकरी संघटना, शेतकरी कामगार संघटना आणि मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेत पिकविम्याच्या माध्यमातून राफेलपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

अन्नदाता शेतकरी संघटना जयाजी सूर्यवंशी आणि शेतकरी कामगार संघटनेचे महेश गुजर यांची प्रतिक्रिया

भाजप सरकार पीक विम्याच्या माध्यमातून निवडणूक निधी वसूल करत असल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला. पीक विमा कंपन्यांवर सरकारचे कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे पीकविमा काढणाऱ्या कंपन्या फसवणूक करत असल्याचा आरोपही जयाजी सूर्यवंशी यांनी केला.

जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यापैकी ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली. मात्र, मिळणारी रक्कम अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. अद्याप २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबत प्रशासन देखील कुठलीच हालचाल करत नाही. तसेच इफको टोकियो ही विमा कंपनी शेतकऱ्यांना दाद देत नसल्याने सर्वजण मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला. शनिवारपर्यंत पीक विमा कंपन्यांनी न्याय दिला नाही तर, तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details