औरंगाबाद- कोरोनाबाधित महिलेची नैसर्गिक प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. बाधित महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ सुखरुप असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
कोरोना बाधित महिलेची नैसर्गिक प्रसूती, औरंगाबादमधील दुसरी घटना
बायजीपुरा इंदिरानगर येथील महिलेला रात्री प्रसूती कळा जाणवल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री बाराच्या सुमारास महिलेला प्रसूतीसाठी नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. महिलेवर उपचार करताना कोरोना संशयित म्हणून उपचार करण्यात आले. सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बायजीपुरा इंदिरानगर येथील महिलेला रात्री प्रसूती कळा जाणवल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री बाराच्या सुमारास महिलेला प्रसूतीसाठी नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. महिलेवर उपचार करताना कोरोना संशयित म्हणून उपचार करण्यात आले. सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नवजात मुलीला घाटीच्या नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले आहे. तर आईवर कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत.
औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात संशयितांच्या कोरोना तपासण्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. शनिवारी रात्री घाटी रुग्णालयात इंदिरानगर येथील एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास प्रसूती कळा आल्याने डॉक्टरांनी तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. प्रसूतीपूर्वी महिलेची कोरोना चाचणी घेत संशयित रुग्णांसारखा रुग्ण अशी खबरदारी घेत नैसर्गिक प्रसूती करण्यात आली. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला.
मुलीचे वजन 2.8 किलो भरले आहे. बाळाची व आईची प्रकृती उत्तम असून प्रसूतीनंतर आईला कोविड केअर सेंटरमध्ये तर बाळाला नवजात शिशू विशेष कक्षात दाखल करण्यात आले. सकाळी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महिलेवर उपचार सुरू असून महिलेचे दूध काढून बाळाला पाजण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोरोना बाधित महिलेच्या प्रसूतीची ही दुसरी घटना औरंगाबादेत घडली. याआधी 16 एप्रिल रोजी मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधित महिलेची सिजर पद्धतीने जिल्हा रुग्णालयात प्रसूती करण्यात आली होती.